RAM-Admissions-Eligibility-selection-criteria-India

पात्रता आणि निवडीचे

निकष

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (RAM) कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे असून, चित्रपट क्षेत्राची आवड असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अन्य कोणत्याही शिक्षणाची अथवा पदवीची अट नाही.

  • रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीज- चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, पटकथालेखन, अभिनय आणि निर्मिती यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

विशेषपद्धतीने तयार करण्यात आलेले हे सर्व अभ्यसक्रम ई-लर्निंग (e-learning in Marathi) स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध विषयांतील तपशीलवार प्रकरणे आणि त्या संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या स्वाध्यायांचा यात समवेश असेल. अत्यंत सुव्यवस्थित संरचना असलेल्या या शैक्षणिक अभ्यासक्रमात, निर्देशात्मक अध्यापन पद्धतीच्या धोरणानुसार, विद्यार्थांच्या प्रश्नांचे ऑनलाईन पद्धतीने निरसन केले जाईल. अशा पद्धतीने शिक्षण घेणे हा एक वेगळा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे.

"ध्येयप्राप्तीची प्रबळ इच्छा निश्चितच तुम्हाला योग्य मार्गावर आणते. तुमचे चित्रपट निर्मितीक्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, तुमच्या पंखात बळ भरणे हेच आमचे ध्येय आहे."

RAM-free-online-training-for-filmmaking-eligibility-India

कृपया तुमची विस्तृत माहिती आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला अद्यतन माहिती देत राहू.