Ramoji-Publications-Ramoji-Academy-of-movies

प्रकाशन विभाग

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजचा प्रकाशन विभाग (Publications Division of Ramoji Academy of Movies) प्रतिभावंत लेखकांना त्यांची प्रतिभा संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी आणि त्यांचे लेखन प्रकाशित करत, नवोदित लेखकांना लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

तुम्ही कथा लेखक आहात का?

काल्पनिक कथांच्या (fiction) प्रकाशनासाठी उत्तम दर्जासह पूर्णतः पब्लिशिंग आणि मार्केटिंगसाठी विभाग मदत करतो. लेखक आणि प्रकाशन विभागाच्या सहकार्याने ऑफलाइन आणि ऑनलाइनच्या मार्गाने विविध चॅनेलद्वारे मोठ्या वाचक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार कार्य केले जाते.

पारदर्शकता

लेखकांची मानधनासंबंधीची चिंता दूर करण्यासाठी प्रकाशन विभागाच्यावतीने सर्व आर्थिक व्यवहार अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जातात. छपाई आणि प्रसिद्धीचा खर्च यांची व्यवस्था झाल्यानंतर लेखकाला त्वरित मानधन देण्याची व्यवस्था करण्यात येते.

सात भारतीय भाषांत प्रकाशन

प्रकाशन विभागाची आपल्या साहित्याच्या समृद्ध परंपरेवर आणि भाषिक विविधतेने नटलेल्या साहित्यिक संस्कृतीवर दृढ श्रद्धा आहे. त्यामुळेच कथांमधील लपून राहिलेली मौक्तिके वेचण्याचा प्रकाशन विभागाचा प्रयत्न असतो.
हिंदी, बांगला, मराठी, तेलगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांतील समकालीन सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याला प्रोत्साहन देत, प्रकाशन विभागाने प्रादेशिक अस्मितेचा आणि परंपरांचा कायम सन्मान केला आहे.

विविधांगी आणि चैतन्यमय साहित्यिक संस्कृतीला प्रोत्साहन देणे, हेच आमच्या प्रकाशन विभागाचे व्यापक उद्दिष्ट आहे.
तुमच्या लेखनाला पुस्तकरूप देण्याची हीच योग्य वेळ आहे. आता, आमच्या माध्यमातून तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन करा!

कृपया तुमची विस्तृत माहिती आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला अद्यतन माहिती देत राहू.