Ramoji-short-film-festival-RFS

रामोजी शॉर्ट फिल्म फेस्टिवल (RSF)

लघुपट हा कथाकथनाचा, सतत विकसित होणारा आणि अत्यंत रोमांचकारी प्रकार आहे, जो चित्रपट या संज्ञेला चैतन्यमय बनवतो. तुलनेने कमी खर्चिक असणारे तंत्रज्ञान आणि साधनांची सहज उपलब्धता यामुळे पोषक वातावरण तयार होऊन एखाद्याच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो.

सर्जनशीलतेने संपन्न असलेले अनेकजण लघुपटाचा पर्याय निवडत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाने केलेली प्रगती आणि समाज माध्यमांमध्ये झालेली क्रांती यामुळे या क्षेत्राची आवड असणाऱ्यांना संधींचे नवे जगच खुले झाले आहे. त्यांना आता गरज आहे ती त्यांच्या अभिव्यक्तीसाठी मंच देण्याची, त्यांना समजावून घेण्याची आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची.

रामोजी शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा गुणवंत कलाकारांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट सर्जनशीलतेची अभिव्यक्ती करण्यासाठीचे आणि स्वतःला आजमावून पाहण्यासाठीचे व्यासपीठ आहे. हा लघुपट महोत्सव म्हणजे कल्पनाशक्तीला चालना देणारा उत्सव, यानिमित्त आयोजित करण्यात येणारी स्पर्धा ही सहभागी प्रतिभावंतांच्या कक्षा रुंदावत त्यांचा अभिव्यक्तीच्या अनंत अवकाशात भरारी घेण्याचा मार्ग प्रशस्त करेल.

रामोजी लघुपट स्पर्धा या रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजतर्फे (RAM) आयोजित करण्यत येणाऱ्या चित्रपट महोत्सवाचा (Film Festival) एक भाग आहे यात हिंदी, बांगला, मराठी, तेलगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या निवडक भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या लघुपटांना सहभाग घेता येईल. रामोजी शॉर्ट फिल्म फेस्टिवल , सहभागी कलाकारांच्या कथानकाची अस्सल कल्पना आणि प्रादेशिकतेची छटा असलेल्या जागतिक संकल्पना यांना प्रोत्साहन देईल.

स्पर्धा

लघुपटांच्या या चित्रपट महोत्सवात(film festival for short films) प्रादेशिक स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.सात प्रादेशिक भाषांतील लघुपटांसाठी पारितोषिक ठेवण्यात येणार आहे.

हिंदी
बांगला
मराठी
तेलगु
तमिळ
कन्नड
मल्याळम

परीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीनुसार, लघुपटांची अस्सल संकल्पना आणि आशयाच्या गुणवत्तेवर लघुपटांची निवड करण्यता येईल.

कृपया तुमची विस्तृत माहिती आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला अद्यतन माहिती देत राहू.