RAM-online-learning-Programs-acting-direction-screenwriting-production-India-in-7languages

अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात

  • Courses Overview

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीज (RAM) ही भारतातील पहिली अशी शिक्षण संस्था आहे ज्या संस्थेने चित्रपट निर्मिती प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान देणाऱ्या आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. हे सर्व अभ्यासक्रम बहुआयामी असून, यांत चित्रपट निर्मितीबाबतची माहिती आणि कौशल्य यांचा समावेश तर आहेच पण त्याच बरोबर, विद्यार्थांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे या अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.

या ऑनलाईन अभ्यासक्रमात चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, पटकथा लेखन, अभिनय आणि निर्मिती यांची मुलभूत तत्त्वे शिकवण्यात येतात.

हे सर्वोत्कृष्ट ऑनलाईन चित्रपट निर्मिती प्रशिक्षण अभ्यासक्रम (Best online filmmaking courses) तुम्हाला तुमच्या सोयीनुसार शिकता येणार आहेत. हिंदी, बांगला, मराठी, तेलगु, तमिळ, कन्नड मल्याळम या सात भारतीय भाषांसह इंग्रजीमधून हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

RAM-Fundamentals-of-filmmaking-free-training-diploma-program
  • चित्रपट निर्मितीची मूलभूत तत्त्वे

चित्रपट निर्मितीच्या मुलभूत तत्त्वांवर आधारलेले हे अभ्यासक्रम चित्रपट निर्मिती प्रक्रीयेच्या विविध पैलूंची ओळख करून देत, विद्यार्थांमध्ये व्यापक दृष्टीकोन निर्माण करतात. चित्रपट क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या दृष्टीने विविध घटकांचा समावेश करून, तयार करण्यात आलेले हे अभ्यासक्रम, विद्यार्थांसाठी अत्यंत आदर्श आणि उपयुक्त आहेत.

  • दिग्दर्शन

कथानकाच्या मूळ हेतूशी प्रामाणिक राहात नाट्यमयपद्धतीने कथानक रंगवणे यासाठी अंगी काटेकोर शिस्त असावी लागते. प्रतिमांची हालचाल, प्रकाश संयोजन आणि भाव निर्मिती करणारे नाट्य यातूनच कथानक पडद्यावर जिवंत होते. दिग्दर्शनात मोठ-मोठ्या गटांचे नेतृत्त्व करणे, सर्जनशीलतेसह योग्य ते निवडणे आणि उत्कृष्ट निर्मितीसाठी कामांची अचूक विभागणी करत योग्य व्यक्तीकडे योग्य ते काम सोपवणे हे सर्व जमणे आवश्यक आहे. चित्रपट दिग्दर्शन हा एक असा अभ्यासक्रम आहे ज्यात, खूप बारकाव्यांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे चित्रपट निर्मिती, कल्पनाशक्ती आणि कल्पनेतील गोष्ट प्रत्यक्षात साकार करण्याचे कसब या प्रत्येक पैलूची सखोल समज असणे आणि अगदी छोट्या छोट्या तपशिलांकडे लक्ष असणे आवश्यक असते.

जर तुमच्याकडे जीवनातील अनुभवांची शिदोरी आहे आणि त्यातून काही सांगण्या सारखे आहे जे तुम्ही वेगळ्यापद्धतीने सांगू शकता, तर हा ऑनलाईन दिग्दर्शनचा अभ्यासक्रम (online film direction course) तुमच्यासाठीच तयार केला आहे. सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणारा हा भारतातील एकमेवाद्वितीय चित्रपट दिग्दर्शनाचा (film direction course in India) ऑनलाईन अभ्यासक्रम (online film direction course) अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा अभ्यासक्रम तुमच्यामधील कौशल्यांचा विकास करून तुम्हाला या क्षेत्रात काम करण्यास सक्षम बनवतो. रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजच्या (RAM) या अभ्यासक्रमाद्वारे सर्जनशील आणि विवेचेनात्मक पद्धतीने शिक्षण देऊन, तुमच्यामधील दिग्दर्शनाची कला आणि कौशल्य विकसित केले जाते. या अभ्यासक्रमातून तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या कथानक मांडणीसाठी आवश्यक असणारे मुलभूत ज्ञान आणि कौशल्य तर मिळेलच त्याचबरोबर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देखील लाभेल.

RAM-online-free-direction-course-in-your-language-India
  • पटकथा लेखन

तुमच्याकडे कथानकाची मुलभूत संकल्पना आहे? आणि तुम्हाला त्याची प्रभावी मांडणी करायची आहे?

संहिता किंवा पटकथा लेखन करणे हे वाटते तितके सोपे मुळीच नाही. पटकथा लेखनात ओघवत्या शैलीत आणि कालक्रमानुसार कथानकातील प्रसंगांचे, सुसंबद्ध भागात लेखन करणे अपेक्षित आहे. असे पटकथा लेखन करता येऊ शकणाऱ्यांना सध्या प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तुम्हाला कथानकातील पात्र रंगवता येत असतील आणि लोकांच्या मनात घर करून राहणरे आकर्षक कथानक लिहिता येत असेल तर मग, निम्मे अंतर तर तुम्ही पार केले आहेच.

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजच्या (RAM) पटकथा लेखनासाठीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाअंतर्गत (online script writing course program in Marathi @RAM) विशेष प्रशिक्षण आणि तज्ञांचे मार्गदर्शन या द्वारे विद्यार्थांमध्ये पटकथा लेखन कौशल्य विकसित केले जाते.

त्यामुळे तुम्ही जर भारतातील पटकथा लेखनाच्या सर्वोत्तम अभ्यासक्रमासाठी (best screenwriting courses in India) प्रवेश घेऊ इच्छिता? जिथे हिंदी , बांगला , मराठी , तेलगु , कन्नड , तमिळआणि मल्याळम  या भाषांसह इंग्रजीमध्ये देखील शिकवले जाते; तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजच्या (RAM) मोफत ऑनलाईन पटकथा लेखन अभ्यासक्रमाबद्दल (free online script writing course in Marathi) अधिक जाणून घ्या.

RAM-Screenwriting-course-online-free-in-7Indian-languages
  • अभिनय

तुम्हाला अभिनयाच्या माध्यमातून भावना व्यक्त करायला आवडतात आणि सादरीकरण करायला आवडते? तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

तुमच्याकडे एखाद्या पात्रात शिरून अभिनय करण्याइतकी संवेदनशीलता आणि अभिनय कौशल्य असेल तर अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. अभिनय म्हणजे काल्पनिक आणि प्रत्यक्षातील किंवा अनुभवलेल्या पात्रांना प्रतिसाद देणे. अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांचे शरीर आणि आवाज यांचा साधन म्हणून वापर करत, त्यांच्या स्मृती आणि कल्पनाशक्तीच्या गुणाने, सर्जनशील अभिनय करतात. अभिनय हा शिकवता येतो, शिकता येतो आणि त्यात परिपूर्णता देखील प्राप्त करता येथे. अभिनयाची अत्यंत आवड असणाऱ्यांसाठीच रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजचा (RAM) हा अभिनयाचा अभ्यासक्रम (free online acting course in Marathi) आहे. अभिनायच्या या मोफत ऑनलाईन अभ्यसक्रमात, अभिनयातील सर्व बारकावे समजावेत यासाठी अभिनय पद्धतींमधील क्लिष्टता दूर केलेली आहे. अभिनय प्रशिक्षणाचे छोटे टप्पे केल्याने विद्यार्थ्यांना विषयाची व्याप्ती आणि खोली समजणे सोपे जाते.

RAM-Acting-course-online-free-in-7Indian-languages