रामोजी ग्रुप – नाविन्याचा ध्यास
‘रामोजी ग्रुप’ हा मागील ६० वर्षांपासून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. याचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे. व्यापक दृष्टीकोन आणि नैतिक मूल्यांच्या बळावर या क्षेत्रातील सर्वात वैविध्यपूर्ण उद्योग समूह म्हणून नावारूपाला येत रामोजी ग्रुप व्यवसाय जगतातील एक आदर्श म्हणून नावारुपाला आला आहे. माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र, चित्रपट निर्मिती, मुद्रित, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमे, एफएम रेडीओ, अतिथीसेवा क्षेत्र, किरकोळ विक्री व्यवसाय, अन्नपदार्थ उत्पादन, आर्थिक सेवा, विविध संकल्पनांवर अधरेले(Thematic Tourism) अर्थात विषयाधारित पर्यटन, विपुलप्रमाणात पायाभूत सुविधांनी युक्त असणारा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडीओ, चित्रपट क्षेत्रासंबंधी प्रशिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा पुरवणे यावर रामोजी ग्रुपने कायमच लक्ष केंद्रित केले आहे.
RAM-Ramoji-Group-world-of-cinema-ushakiron-Movies-India

चित्रपट क्षेत्रात गेली ४० वर्षे व्यावसायिकदृष्ट्या कार्यरत असलेल्या या आस्थापनाने सुमारे ८६ हून अधिक चित्रपट निर्माण केले आहेत. या सर्व चित्रपटात निखळ मनोरंजनासह आशयघन विषय हाताळले आहेत. ‘नाचे मयुरी’, ‘प्रतिघटना’ आणि अन्य अनेक चित्रपट प्रचंड गाजले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. रामोजी फिल्म सिटी हा (Ramoji Film City) जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडियो असून त्याची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये देखील करण्यता आली आहे. या फिल्म सिटीमध्ये सुसज्ज पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठीची विविध ठिकाणे, चित्रीकरणासाठी तयार असणारे सेट, चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्य सुविधा उपलब्ध आहेत. आजपर्यंत येथे २६ हजारहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. रामोजी फिल्म सिटी ही पर्यटनासाठी देखील फार प्रसिद्ध आहे. श्वास रोखून धरायला लावणारे मार्ग, संकल्पनांवर आधारलेरी आणि पर्यटकांशी संवाद साधणारी संरचना, स्टुडियो सफर, पक्षी आणि फुलपाखरू उद्याने, रोज होणारे विविध कार्यक्रम आणि सादरीकरणे, रोमांचकारी प्रयोग, खेळ, साहसी खेळ, रंगतदार सफरी, इको टूअर, खाद्यपदार्थांची आणि विविध वस्तूंची दुकाने आणि पर्यटकांच्या सोयीनुसार निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारी उत्तमोत्तम हॉटेल्स हे रामोजी फिल्म सिटीचे(Ramoji Film City) वैशिष्ट्य आहे.

Ramoji-Group-quality-driven-entertainment

EFM रेडीओ वाहिनीवरून स्थानिक आणि प्रादेशिक ढंगाचा, संवादात्मक आणि रंगतदार स्वरूपाचा आशय प्रसारित केला जातो. रामोजी ग्रुपचे दूरचित्र वाहिन्यांचे स्वतःचे असे विशेष जाळे आहे. ETV बाल भारत ही खास लहानमुलांसाठीची आणि विविध भातीय भाषांमध्ये प्रसारित केली जाणारी वाहिनी आहे. ही वाहिनी म्हणजे मुलांसाठी मनोरंजन, मौज, ज्ञान आणि माहिती यांचे अचूक मिश्रण आहे. त्याचप्रमणे ETV Win या तेलगु (OTT) ओटीटी प्लॅटफॉर्मवर मालिका, चित्रपट आणि अन्य अनेक माहितीपूर्ण आशय उपलब्ध आहे.

RAM-Ramoji-Group-Print-broadcast-digital-media-India

आंध्र प्रदेश, ETV तेलंगणा यांसारख्या वृत्तवाहिन्या आंतरराष्ट्रीय विषयांपासून ते स्थानिक बातम्यांपर्यंत सर्व घडामोडींचा तपशील प्रसारित करतात. रामोजी ग्रुपच्या वृत्तवाहिन्यांनी नेहमीच सर्जनशील आणि दर्जेदार पत्रकारितेची मानके स्थापन करत, प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे बातमी पोहोचवण्याची क्षमता निर्माण केली आहे. ETV Bharat हा सर्वात मोठ्या डिजिटल उपक्रमांपैकी एक उपक्रम असून, इंग्रजीसह देशातील १२ प्रमुख भाषांत उपलब्ध आहे. ETV Bharat या डिजिटल उपक्रमाचा एक प्रमुख विभाग म्हणजे, ETV Bharat मराठी, या एप्लिकेशन  आणि पोर्टलच्या माध्यमातून देशातील २८ राज्यांमधील बातम्यांचे वार्तांकन केले जाते.

RAM-Ramoji-Group-Hyderabad-telangana-India

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् आणि हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथील डॉल्फिन हॉटेल्स ही पर्यटकांना परवडणाऱ्या दारात आणि उच्च दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देतात. विषयाधारित आतिथ्यसेवा हे फिल्म सिटीचे अजून एक वैशिष्ट्य. रामोजी ग्रुपचे प्रिया फुड्स हे नाव देखील भारतीय खाद्यपदार्थांच्या पारंपारिक आणि अस्सल चवीमुळे घराघरात पोहोचले आहे. लोणचे, मसाले, तयार खाद्यपदार्थ यांसारखी प्रिया फुड्सची अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. कलांजली शो-रुमच्या शाखा, देशातील विविध शहरांत, काळजीपूर्वक बनवलेल्या कलाकृती, हस्तकला आणि हातमागाची दर्जेदार उत्पादने अत्यंत रास्त दरात उपलब्ध करून देतात. रामोजी ग्रुपची ‘सुखी भव’ ही आरोग्य केंद्रे उत्तम आरोग्यासाठी वैकल्पिक आणि पारंपरिक उपचार पद्धती या दोन्ही सेवा देतात.