रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (Ramoji Academy of Movies-RAM), मनोरंजन क्षेत्रातील भावी कलाकार घडवले जातात. रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (RAM) तुम्ही, चित्रपट निर्मिती (filmmaking in Marathi), चित्रपट दिग्दर्शन (Direction in Marathi), पटकथा लेखन (Screenwriting in Marathi), अभिनय (Acting for Marathi Films) आणि निर्मिती (Production in Marathi) यांसारखे अभ्यासक्रम ऑनलाईनपद्धतीने अगदी नि:शुल्क (free online courses in Marathi) शिकू शकता.
चित्रपट निर्मितीक्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्यांना रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (RAM), चित्रपट निर्मितीक्षेत्रा संबंधीचे आवश्यक असणारे ज्ञान देण्यात येईल. तसेच मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम बनवले जाईल.
देशभरातील विद्यार्थांना इंग्रजीसह, हिंदी, बांगला, मराठी , तेलगु , कन्नड , तमिळ आणि मल्याळम या भाषांमधून चित्रपट क्षेत्रातील जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम (online courses for film) , ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे, हेच रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजचे (RAM) उद्दिष्ट आहे.
रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीज (RAM), हा हैद्राबाद येथील बहुआयामी उद्योग समूह असलेल्या ‘रामोजी ग्रुप’चा एक भाग आहे. मागील ६० वर्षांपासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेला रामोजी ग्रुप, व्यापक दृष्टीकोन आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर या क्षेत्रातील सर्वात वैविध्यपूर्ण उद्योग समूह म्हणून नावारूपाला येत, उद्योग जगतात आदर्श ठरला आहे. माध्यमे (Media) आणि मनोरंजन क्षेत्र, चित्रपट निर्मिती, मुद्रित (Print), दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमे, एफएम रेडिओ, अतिथीसेवा क्षेत्र, किरकोळ विक्री दुकानांची साखळी, खाद्यपदार्थ उत्पादन, आर्थिक साहाय्य, विविध संकल्पनांवर अधरेले अर्थात विषयाधारित पर्यटन (Thematic Tourism), उत्तम पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणारा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडीओ, चित्रपट क्षेत्रासंबंधी प्रशिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा पुरवणे यावर रामोजी ग्रुपने कायमच लक्ष केंद्रित केले आहे.
रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (RAM) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये, चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता निर्माण व्हावी अशाच पद्धतीने प्रशिक्षण देण्याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी चालून येतील. रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजमध्ये (RAM), देशभरातील गुणवंत विद्यार्थांना चित्रपट क्षेत्रासंबंधीचे उत्तम प्रशिक्षण देऊन, त्यांच्यातील गुणांचा विकास केला जाईल.
रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीज स्पर्धा
रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजच्यावतीने (RAM) चित्रपट मोहोत्सावाचा एक भाग म्हणून, रामोजी लघुपट स्पर्धांचे (Ramoji short film competitions-RSF )आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नवोदित चित्रपट निर्मात्यांना निमंत्रित करण्यात येते. या स्पर्धांच्या माध्यमातून, नवोदित चित्रपट निर्मात्यांना समृद्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या स्पर्धांमुळे नवोदितांचा चित्रपट निर्मितीक्षेत्रातील रस अधिक वाढतो, त्याचप्रमाणे त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना मिळते आणि काहीतरी उत्कृष्ट करून दाखवण्याचा ध्यास लागतो.
चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचणे हे रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजचे (RAM) ध्येय आहे. रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजचे (RAM ) चित्रपट निर्मिती संबंधीचे सर्व ऑनलाई अभ्यासक्रम (online courses in filmmaking) हे आपल्या याच ध्येयाबद्दलच्या बांधिलकीचे अत्यंत समर्पक आणि आदर्श उदाहरण आहेत.
" चित्रपट निर्मिती म्हणजे एकाच जीवनात अनेक आयुष्य जगणायची संधी. "